22 November 2024 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअरने अल्पावधीत दिला 55 टक्के परतावा, पण पुढे फायदा की नुकसान होणार?

Adani Gas Share Price

Adani Gas Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत 176.64 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत अदानी टोटल गॅस कंपनीच्या निव्वळ नफ्यात 17.61 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत अदानी टोटल गॅस कंपनीने 150.19 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1028.15 कोटी रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी अदानी टोटल गॅस स्टॉक 1.77 टक्के घसरणीसह 1,010 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

अदानी टोटल गॅस कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत 1244 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने 1185.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर 2023 च्या तिमाहीत या कंपनीचा EBITDA 288 कोटी रुपये नोंदवला गेला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या EBITDA मध्ये 25 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. डिसेंबर 2023 च्या तिमाहीत अदानी टोटल गॅस कंपनीचे मार्जिन 411 बेसिस पॉईंट्सनी वाढून 24.9 टक्के नोंदवले गेले आहे.

अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स अद्यापही आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या 73 टक्के खाली ट्रेड करत आहे. 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3918.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 30 जानेवारी 2024 रोजी हा स्टॉक 1028.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका वर्षात अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 52 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत.

मागील 6 महिन्यांत अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. 31 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 663.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स 1010 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2601.25 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 521.95 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Gas Share Price NSE Live 31 January 2024.

हॅशटॅग्स

Adani Gas Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x