23 November 2024 8:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 14 रुपये! वोडाफोन आयडिया शेअरची रेटिंग आणि टार्गेट प्राइस जाहीर

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया या दूरसंचार क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 30 जानेवारी 2024 रोजी 2 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. तर दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 1.43 टक्क्यांच्या घसरणीसह 14.49 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे.

नुकताच या कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. या निकालांनी गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी वोडाफोन आयडिया स्टॉक 1.38 टक्के घसरणीसह 14.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

वोडाफोन आयडिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 70,536.87 कोटी रुपये आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीला 6,985.9 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला 7,990 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता, जो या तिमाहीत 12.56 टक्के कमी झाला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत वोडाफोन आयडिया कंपनीने 0.49 टक्क्यांच्या वाढीसह 10,673.1 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 10,621 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 1.40 टक्क्यांच्या वाढीसह 40.8 टक्के नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा EBITDA 39.4 टक्के नोंदवला गेला होता.

वोडाफोन आयडिया कंपनीचा प्रति ग्राहक सरासरी महसूल संकलन डिसेंबर तिमाहीत 145 रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत प्रति ग्राहक सरासरी महसूल 135 रुपये होता. त्याचप्रमाणे कंपनीच्या ग्राहकांची एकूण संख्या मागील वर्षी याच तिमाहीत 13.53 कोटी होती, जी आता 13.74 कोटीवर आली आहे.

ब्रोकरेज हाऊस UBS च्या तज्ञांनी वोडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग जाहीर करून 11.5 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्मने सांगितले की, कंपनीची डिसेंबर तिमाहीची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही.

कंपनीचा तिमाही महसूल सपाट होता, जो तज्ञांच्या अंदाजापेक्षा 2.5 टक्के कमी नोंदवला. आणि कंपनीचा EBITDA तिमाही-दर-तिमाही आधारे 1.6 टक्के वाढला आहे. तज्ञांच्या अंदाजापेक्षा कंपनीचा EBITDA 3.8 टक्के कमी नोंदवला गेला आहे. मागील वर्षी डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीवर एकूण 2,14,960 कोटी रुपये कर्ज होते.

मागील एका महिन्यात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 15 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. मात्र मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 74 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात वोडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 105 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 31 January 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(124)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x