18 October 2024 10:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका - NSE: RVNL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरने यावर्षी 41% परतावा दिला, तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN GTL Share Price | GTL पेनी शेअर 45 रुपयांची पातळी स्पर्श करणार, कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला - BSE: 513337 Horoscope Today | या राशींच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार, प्रमोशन वाढीचा देखील आहे योग, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य Festive Season Fashion | सणासुदीच्या काळात हवा आहे परफेक्ट लूक, तर या 4 साड्यांचे कलेक्शन तुमच्याजवळ असलेच पाहिजे Viral Video | गिटार वाजवून अन् गाणं गाऊन विकली भाजी, विक्रेत्याची अनोखी शक्कल, VIDEO व्हायरल - Marathi News SBI Mutual Fund | तुमच्या मुलांसाठी खास म्युच्युअल फंड योजना, छोटी SIP देईल 13,51,267 रुपये परतावा - Marathi News
x

Man Infra Share Price | अवघ्या 11 रुपयाच्या शेअरची कमाल! 2063% परतावा घेत गुंतवणुकदार करोडपती झाले, खरेदी करावा?

Man Infra Share Price

Man Infra Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत होती. आजपासून केंद्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळे शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. याचा सकारात्मक परिणाम अनेक कंपन्याच्या शेअर्सवर देखील पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत होती.

आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली सुरू झाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह 238 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 0.75 टक्के घसरणीसह 236.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कोरोना काळात म्हणजेच 3 एप्रिल 2020 रोजी मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांक किंमत पातळीवरून हा स्टॉक तब्बल 2063 टक्के मजबूत झाला आहे. नुकताच मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीने एक अपडेट जाहीर केली की, कंपनीने घाटकोपर पूर्व, मुंबई येथे उबर लग्जरियस रेजिडेंस आराध्या वन पार्क या नावाने एक गृह प्रकल्प लाँच केला आहे. यामधे कंपनीने आतापर्यंत 333 कोटी रुपये मूल्याची विक्री साध्य केली आहे. या मॅन कंपनीने एकूण संभाव्य विक्रीपैकी 25 टक्के लक्ष साध्य केले आहे.

मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीने मुंबईतील घाटकोपर पूर्व याठिकाणी उबर लग्जरियस रेजिडेंस आराध्या वन पार्क हा रहिवासी गृह प्रकल्प लाँच केला आहे. या कंपनीला सर्व मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाद्वारे चार लाख चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ विकण्यास मदत होणार आहे. मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीने माहिती दिली की, कंपनीला आराध्या वन पार्कसाठी सर्व आवश्यक परवानगी प्राप्त झाल्या आहेत. कंपनीने आपले बांधकाम कार्य देखील सुरू केले आहे.

मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनी आपल्या उबर लग्जरियस रेजिडेंस आराध्या वन पार्क प्रकलापत 3 BHK, 4 BHK आणि 5 BHK असे अति आलिशान रहिवासी निवासस्थानाचे बांधकाम करणार आहे. कंपनी या प्रकल्पाद्वारे आपल्या ग्राहकांना 50 पेक्षा जास्त सुविधा प्रदान करणार आहे. नुकताच कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या संचालकांनी परिवर्तनीय वॉरंटद्वारे 5.5 अब्ज रुपये भांडवल उभारणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. ही कंपनी 155 रुपये प्रति शेअर किमतीवर वॉरंट जारी करून भांडवल उभारणी करणार आहे. आदित्य चांडक यांना 32.4 लाख वॉरंट आणि क्वांट म्युच्युअल फंडाला 17.5 लाख वॉरंट यापूर्वीच वाटप करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Man Infra Share Price NSE Live 01 February 2024.

हॅशटॅग्स

Man Infra Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x