Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल, यापूर्वी 1 वर्षात 300% परतावा दिला
Stocks To Buy | आरईसी लिमिटेड या पॉवर फायनान्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. त्यांनतर या कंपनीच्या शेअर्समध्ये दैनिक उच्चांक किमतीवरून नफा वसुली पाहायला मिळाली होती. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. REC Share Price
मागील एका वर्षात आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज फर्म निर्मल बंगच्या तज्ञांच्या मते, आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. आज गुरूवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.91 टक्के घसरणीसह 494.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
निर्मल बंग सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 675 रुपये टार्गेट प्राइज जाहीर केली आहे. 30 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर 493 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक आणखी 37-38 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. अवघ्या एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 150 टक्के वाढली आहे.
ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, भारतीय वीज क्षेत्रात आर्थिक वर्ष 2022-27 मध्ये 212GW क्षमतेची वाढ होणे अपेक्षित आहे. नोव्हेंबर 2023 पर्यंत भारताची स्थापित उर्जा निर्मिती क्षमता 426GW होती. CARE नुसार, या कालावधीत वीज क्षमता वाढीसाठी 10.9 लाख कोटी रुपये गुंतवणूक आवश्यक आहे.
आरईसी कंपनीसाठी ट्रान्समिशन, वितरण आणि रस्ते, रेल्वे आणि विमानतळ यासारख्या इतर पायाभूत सुविधांमध्ये वित्तपुरवठा करण्याच्या अनेक संधी निर्माण होणार आहे. RBI च्या मते, आर्थिक वर्ष 2023-30 मध्ये भारतात ग्रीन फायनान्सिंगसाठी 85.6 लाख कोटी रुपये गुंतवणूकीची आवश्यकता भासणार आहे.
ब्रोकरेज फर्मच्या मते, आरईसी लिमिटेड कंपनीचे AUM आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत 4.97 लाख कोटी रुपये नोंदवले गेले होते. मार्च 2025 पर्यंत आरईसी लिमिटेड कंपनीचे AUM 6 लाख कोटी पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष 2024-28 दरम्यान कंपनीच्या AUM वाढीचा दर 16 टक्के CAGR राहण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2013-23 दरम्यान आरईसी लिमिटेड कंपनीचा निव्वळ NPA 0.8 टक्क्यांवर आला होता.
आर्थिक वर्ष 2018 मध्ये कंपनीचा NPA 5.8 टक्के नोंदवला गेला होता. FY24 च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचा क्रेडिट खर्च नकारात्मक राहू शकतो. 2009-11 च्या शेवटच्या पॉवर अपसायकल दरम्यान, आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने सातत्याने 2-3 पट वाढीच्या P/B मल्टिपलवर ट्रेड केला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 675 रुपये निश्चित केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy on call on REC Share Price 01 February 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार