22 November 2024 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Rathi Steel Share Price | टाटा स्टील शेअर पेक्षा फायद्याचा! किंमत 48 रुपये! 6 महिन्यात 1250% परतावा दिला

Rathi Steel Share Price

Rathi Steel Share Price | राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 13 लाखांपेक्षा जास्त झाले असते.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1250 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 48.08 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अपर सर्किटमध्ये अडकले होते. मागील वर्षी 3 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 जानेवारी 2024 रोजी राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 45.32 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. म्हणजेच मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1373 टक्के परतावा कमावून दिला आहे.

जर तुम्ही जुलै 2022 मध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर तुम्हाला 30,303 शेअर्स मिळाले असते. सध्याच्या किमतीनुसार तुमच्या शेअर्सचे मूल्य 13.73 लाख रुपये झाले असते. मागील 1 महिन्यात राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.

राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड या कंपनीची स्थापना 1971 साली झाली होती. या कंपनीचे 51 टक्के भाग भांडवल कंपनीच्या प्रवर्तकांनी धारण केले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 40 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 139 कोटी रुपये आहे. राठी स्टील कंपनीने आपले सप्टेंबर 2023 मध्ये तिमाही निकाल जाहीर केले होते. त्यात कंपनीचा महसूल जूनच्या तिमाहीच्या तुलनेत 21 कोटी रुपयेने घटला होता.

सप्टेंबर तिमाहीत या कंपनीने 128 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सप्टेंबर तिमाहीत राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीने तब्बल 82 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर जून 2023 तिमाहीत या कंपनीचा नफा 2 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मार्च तिमाहीत या कंपनीने जवळपास 80 कोटी रुपये नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rathi Steel Share Price NSE Live 01 February 2024.

हॅशटॅग्स

Rathi Steel Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x