16 November 2024 2:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

Vakrangee Share Price | शेअरची किंमत 30 रुपये! 2 दिवसात 22 टक्के परतावा दिला, खरेदी करावा का?

Vakrangee Share Price

Vakrangee Share Price | वकरंजी लिमिटेड या आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वकरंजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 30.18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,197.61 रुपये होते. आज गुरूवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी वकरंजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.49 टक्के वाढीसह 30.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

29 जानेवारी रोजी वकरंजी लिमिटेड कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 6 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी राइट्स इश्यूबाबत चर्चा करणार आहे. वकरंजी लिमिटेड कंपनी राइट्स इश्यूद्वारे भांडवल उभारणी करण्याचा विचार करत आहे. राइट्स इश्यू अंतर्गत अनेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना प्राधान्य आधारावर शेअर्स विकून भांडवल उभारणी करत असतात. यासह कंपनी लवकरच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.

डिसेंबर तिमाहीत वकरंजी लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 42.60 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 57.40 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. वकरंजी होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने वकरंजी लिमिटेड कंपनीचे 25,09,50,388 शेअर्स म्हणजेच जवळपास कंपनीचे 23.69 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. INJD कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने देखील वकरंजी लिमिटेड कंपनीचे 12 टक्क्यांपेक्षा जास्त भाग भांडवल धारण केले आहे.

वकरंजी लिमिटेड कंपनीची स्थापना 1990 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः माहिती तंत्रज्ञान संबंधित क्षेतर्टन व्यवसाय करते. ही कंपनी सध्या भारतात 31 विविध राज्यातील 560 जिल्ह्यांमध्ये आपल्या सेवा प्रदान करत आहे. भारतात या कंपनीचे 21240 आउटलेट्स चालू आहेत. ही कंपनी एटीएम, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक सेवा या सारख्या क्षेत्रात आपला व्यवसाय विस्तार करत आहे.

वकरंजी लिमिटेड कंपनीला व्हाईट लेबल एटीएम स्थापन करण्यासाठी RBI ने परवानगी दिली आहे. सध्या वकरंजी लिमिटेड ही कंपनी ग्रामीण भारतात ATM सेवा प्रदान करणारी चौथी सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीच्या सेवा भागीदारांमध्ये पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदासह अनेक सरकारी बँका सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vakrangee Share Price NSE Live 01 February 2024.

हॅशटॅग्स

Vakrangee Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x