19 April 2025 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Sarveshwar Foods Share Price | शेअरची किंमत 7 रुपये! तेजीने पैसा वाढवतोय हा शेअर, खरेदी करणार का?

Sarveshwar Foods Share Price

Sarveshwar Foods Share Price | चालू आठवड्याच्या सुरूवातीपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा तेजी मंदीच्या काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशीच काहीशी उलाढाल सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्समध्ये पाहायला मिळत आहे.

सर्वेश्वर फूड्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 710 कोटी रुपये आहे. सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 15.69 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 4 रुपये होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 24 टक्के नफा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 2.76 टक्के वाढीसह 7.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सर्वेश्वर फूड्स कंपनीने नुकताच आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ दिला आहे. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड या कंपनीची स्थापना जम्मू काश्मीरमध्ये 2004 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः बासमती तांदळाचे उत्पादन, व्यापार आणि निर्यात संबंधित व्यवसाय करते. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, गुंतवणुकदार सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स घसरणीच्या काळात खरेदी करू शकतात.

सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअरधारकांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. यासह कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 10 तुकड्यात विभजीत केले आहेत. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले की, कंपनीने जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम आणि डोडा येथे दोन एसएफएल चौपालची सुरुवात केली आहे.

या माध्यमातून कंपनीला अक्रोड, राजमा, सफरचंद, गुची, काळे, जिरे आणि इतर वस्तू थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणे सोपे जाणार आहे. हे खरेदी सुविधा केंद्र सर्वेश्वर फूड्स कंपनीला व्यवसाय विस्तार करण्यास हातभार लावणार आहे. सर्वेश्वर फूड्स कंपनी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये 12 SFL चौपाल चालवत असून स्थानिक शेतकऱ्यांना देखील प्रशिक्षित करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sarveshwar Foods Share Price NSE Live 01 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Sarveshwar Foods Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या