12 December 2024 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर 50 रुपयांवर पोहोचला, पुढे मल्टिबॅगर परतावा मिळेल? सकारात्मक अपडेट

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत, त्यामुळे शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 48.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीने डिसेंबर तिमाहीत निव्वळ नफ्यात 160 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.73 टक्के वाढीसह 50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 149 टक्के परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच अवघ्या सहा महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहे.

चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा सोल्यूशन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 160 टक्के वाढीसह 203.04 रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीचा निव्वळ नफा 78.18 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या उपाध्यक्षांनी एका निवेदनात म्हंटले आहे की, “आर्थिक वर्ष 2023-24 च्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने मजबूत कामगिरी केली आहे. कंपनी पुढील काळात आपल्या ग्राहकांना सुधारित ग्राहक अनुभव देण्यास वचनबध्द आहे. एक मजबूत संघटना आणि व्यवस्थापन संरचना तयार करणे हे कंपनीचे उद्दीष्ट आहे”.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 02 February 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(270)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x