18 November 2024 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, नेमकं कारण काय?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये भरघोस खरेदी सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पात भारतीय ऊर्जा क्षेत्राचा विकास करण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्याचे आपण पाहिले. याचाच सकारात्मक परिणाम भारतातील ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये पाहायला मिळत आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 396.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मार्च 2023 मध्ये टाटा पॉवर स्टॉक 182.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. तर आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 1.03 टक्के वाढीसह 392.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अँटिक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स पुढील काळात 450 रुपये किमतीवर जाऊ शकतात. टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी कंपनीने चेंगमारी टी इस्टेट या आशिया खंडातील सर्वात मोठ्या चहाच्या मळ्यामध्ये 1040 किलोवॅट क्षमतेचा बायफेशियल सोलर सिस्टीम प्रकल्प सुरू केल्याची माहिती दिली आहे. उत्तर-पूर्व भारतात सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाची ओळख ऑन-ग्राउंड बायफेशियल मॉड्यूल अशी आहे.

नुकताच पीएम नरेंद्र मोदींनी घोषणा केलेल्या ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ च्या घोषणेमुळे शेअर बाजारातील अनेक गुंतवणुकदार स्टॉक वाढीच्या अपेक्षेने टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सकडे आकर्षित होत आहेत. मोदींनी या योजनेची घोषणा 22 जानेवारी 2021 रोजी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी केली होती.

1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली की, भारतात एक कोटी घरावर रूफटॉप सोलर सिस्टीम बसवून एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकेल. त्यामुळे या कुटुंबांचे वार्षिक 15000 ते 18000 रुपये वीज बिल कमी होणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 02 February 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(129)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x