26 November 2024 2:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | TTML शेअर रॉकेट तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर स्टॉक फोकसमध्ये आला - NSE: TTML Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Low Cost Business | कमी पैशांत सुरू होणाऱ्या या व्यवसायातून करा लाखोंची कमाई; अशी करा सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण माहिती Quant Small Cap Fund | मार्ग श्रीमंतीचा, 10,000 रुपयांच्या SIP बचतीवर मिळतील 5 कोटी रुपये, इथे पैसा वाढवा - Marathi News Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना; लाखोंचा परतावा हवा असल्यास, पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची BEL Vs HAL Share Price | BEL आणि HAL सहित हे 3 डिफेन्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा, यापूर्वी 573% परतावा दिला - NSE: IRB
x

Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 7 रुपये! नवीन अपडेट येताच शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्समध्ये सकारात्मक अपडेटच्या पार्श्वभूमीवर मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 31 जानेवारी रोजी विकास लाइफ केअर कंपनीच्या संचालक मंडळाने पार पडलेल्या बैठकीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये विकास लाइफ केअर एलएलसी नावाची कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी विकास लाइफ केअर कंपनीचे शेअर्स 4.41 टक्के वाढीसह 7.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आता विकास लाइफ केअर कंपनी UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये विकास लाइफ केअर LLC या नावाने एक कंपनी स्थापन करणार आहे. यासह कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीच्या व्यवस्थापन नेतृत्वात बदल करण्याची घोषणा केली आहे. यूएईमध्ये केली जाणारी विकास लाइफ केअर एलएलसी या नवीन कंपनीचे अधिकृत भाग भांडवल 10 लाख दिनार असेल. या कंपनीचे 1000 शेअर्स 1000 दिनार किमतीवर जारी केले जाणार आहे. कंपनीने सुरेश मेनन यांना संचालक पदावर नियुक्त केले आहे.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पहायला मिळाली होती. बुधवारी हा स्टॉक 4.67 टक्क्यांच्या घसरणीचसह 7.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1020 कोटी रुपये आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.70 रुपये होती.

मागील एका वर्षात विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 4.25 रुपये किमतीवरून 45 टक्के वाढले आहेत. 1 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी ऑगस्ट महिन्यात विकास लाइफ केअर स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 135 टक्के वाढले आहे.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाने पात्र संस्थात्मक प्लेसमेंटच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात भांडवल उभारणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. विकास लाइफ केअर कंपनीने QIP च्या माध्यमातून 50 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. या कंपनीने QIP च्या पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपये निधी जमा केला होता. आता कंपनीच्या संचालक मंडळाने पात्र संस्थात्मक प्लेसमेंटद्वारे 7.08 रुपये प्रति इक्विटी शेअर फ्लोअर प्राइसवर 50 कोटी रुपये उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 02 February 2024.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x