25 November 2024 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News
x

Multibagger Stocks | 32 रुपयाचा शेअर रॉकेट वेगात पैसा देतोय, 15 दिवसात दिला 50% परतावा, खरेदी करणार?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | चालू आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला केला आहे. हे देखील एक कारण आहे, ज्यामुळे शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. या अर्थसंकल्पात सरकारने देशातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी 11.11 लाख कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. Salasar Exteriors Share Price

त्यामुळे इन्फ्रा सेक्टरमधील दिग्गज कंपन्याच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी सालासर एक्सटीरियर कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 32 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सालासर एक्सटीरियर कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 15 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 30.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यासह सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर कंपनीने कर्जमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी निर्माण झाली आहे.

15 जानेवारी 2024 रोजी सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 1 फेब्रुवारी रोजी या कंपनीचे शेअर्स 30 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 15 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे.

सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर ही कंपनी मुख्यतः सुरक्षित आणि नाविन्यपूर्ण उपायांसह पायलिंग काम, सिव्हिल वर्क, सुपर स्टील आणि स्ट्रक्चरल वर्क, इंटीरियर वर्क, हार्ड फिनिशिंग, फर्निचर वर्क आणि इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग, फायर फायटिंग या सारखे काम करण्याचा व्यवसाय करते. सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 35.08 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 18.65 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Salasar Exteriors Share Price 02 February 2024.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(456)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x