24 November 2024 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
x

JP Power Share Price | शेअरची किंमत 18 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअरने उच्चांकी पातळीला स्पर्श केला, पुढे मजबूत तेजीत येणार?

JP Power Share Price

JP Power Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड (JP Power Share) कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह 19.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही दिवसांपासून जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. डिसेंबर 2023 च्या तिमाहीत जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीने 172.85 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 99 टक्क्यांनी पडले होते. मात्र मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स स्टॉक 4.41 टक्के (JP Power Share Price BSE) वाढीसह 18.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (JP Power Share Price NSE)

आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स स्टॉक 99 टक्के घसरल्यानंतर 60 पैशांवर आला होता. मात्र या स्टॉकमध्ये पुन्हा खरेदी सुरू झाली आणि शेअर्सची किंमत 19 रुपये किमतीवर पोहचली. 4 जानेवारी 2008 रोजी या कंपनीचे शेअर्स 137 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 27 मार्च 2020 रोजीपर्यंत या कंपनीचे शेअर्स 99 टक्क्यांनी घसरून 60 पैशांवर आले होते. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत सुधारणा झाली आहे.

मागील 4 वर्षात जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3043 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 19.23 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 5.17 रुपये होती. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत या कंपनीने तब्बल 172.85 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर सप्टेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 68.66 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. JP Power

मागील वर्षी याच तिमाही कालावधीत जेपी पॉवर कंपनीला 217.97 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मागील 6 महिन्यांत जेपी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 195 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 6.45 रुपयेवरून वाढून 19 रुपये किमतीवर पोहोचली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Power Share Price NSE Live 03 February 2024.

हॅशटॅग्स

JP Power Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x