27 November 2024 7:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

Suzlon Share Price | शेअर प्राईस 48 रुपये! 1 वर्षात दिला 450% परतावा, शेअर चार्ट-पॅटर्न देतोय तेजीचा संकेत

Suzlon Share Price

Suzlon Share Price | नुकताच केंद्र सरकारने संसदेत अंतरिम बजेट सादर केला आहे. त्यात पवन ऊर्जा क्षेत्राला चालना देण्याबाबत सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. या घोषणेचा परिणाम शुक्रवारी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर पाहायला मिळाला. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 50.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी पाहायला मिळत आहे.

यापूर्वी 5 ऑगस्ट 2011 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 50.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला होता. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 450 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 20 टक्के वाढू शकतात. आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.72 टक्के वाढीसह 48.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच मांडण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात भारत सरकारने 1 गिगावॅट ऑफशोअर पवन ऊर्जा क्षमतेच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. सुझलॉन एनर्जी ही कंपनी भारतातील सर्वात मोठी पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 49.90 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मात्र काही तासात शेअर 50 रुपये किमतीवर पोहोचल्यानंतर किंचित घसरला. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्सने इंट्राडे ट्रेडमध्ये 50.72 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स चार्ट पॅटर्नवर सकारात्मक वाढीचे संकेत देत आहेत. तज्ञांनी गुंतवणुकदारांना हा स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र नुकसान टाळण्यासाठी तज्ञांनी 45 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 55 ते 60 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अफाट नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एक वर्षापूर्वी सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 450 टक्क्यांनी वाढले आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 9.20 रुपयेवरून वाढून 50.72 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 170 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 68,229 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 05 February 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x