22 November 2024 11:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स नवीन उच्चांकी पातळी स्पर्श करणार? तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा स्टॉक 8 टक्क्यांच्या वाढीसह 949.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे मजबूत निकाल जाहीर केले आहे. आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.94 टक्के वाढीसह 935.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज फर्म नोमुराने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1057 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. जागतिक ब्रोकरेज हाऊस जेफरीजच्या तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. जेफरीजच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1100 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 133.32 टक्के वाढीसह 7100 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 3,043 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. टाटा मोटर्स कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली की, डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 25 टक्के वाढीसह 1,10,600 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

टाटा मोटर्स कंपनीने माहिती दिली की, “आम्ही तिन्ही वाहन व्यवसायांच्या कामगिरीबाबत सकारात्मक आहोत. नवीन मॉडेल्स आणि जॅग्वार लँड रोव्हरच्या कामगिरीतील सुधारणामुळे मार्च तिमाहीत देखील कंपनीला सकारात्मक कामगिरीची अपेक्षा आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीवरील निव्वळ कर्ज 9,500 कोटी रुपयेने कमी झाले आहे. आणि कंपनी लवकरच आपले कर्ज आणखी कमी करण्याचे लक्ष्य साध्य करेल असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे”.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 06 February 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x