22 November 2024 9:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

युपी'मध्ये पावसामुळे १५ जणांचा मृत्यू तर १३३ इमारती कोसळल्या

Utter Pradesh, Yogi Sarkar, Yogi Government, Mayawati, Akhilesh Yadav, SP, BSP

लखनऊ : युपी’मध्ये पावसाचा हाहाकार मजल्याचे दिसत आहे. कारण सलग तीन दिवस धोधो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. राज्यातील तब्बल १४ जिल्ह्यांना या जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. जोरदार वादळी वारा आणि वीज कोसळल्यामुळे आतापर्यंत एकूण १५ जणांचा दर्दैवि मृत्यू झाला आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्यते उपचार सुरू आहेत.

दरम्यान पावसाच्या तडाख्यामुळे तब्बल १३३ इमारती कोसळल्याने त्यात अनेकजण गंभीर जखमी झाले असून अनेकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील सर्व जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. एकंदरीत पावसामुळे आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. जोरदार पावसाचा फटका हा जनावरांना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. १३३ इमारती कोसळल्या आहेत. अनेकजण जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांची घरं आणि सार्वजनिक मालमत्ता यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हॅशटॅग्स

#india(222)#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x