24 November 2024 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Vikas Ecotech Share Price | शेअरची किंमत 4 रुपये 80 पैसे! वेळीच खरेदी करा,आजही 8 टक्के परतावा दिला

Vikas Ecotech Share Price

Vikas Ecotech Share Price | शेअर बाजारात कमालीची अस्थिरता असताना सोमवारी विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.45 टक्क्यांच्या वाढीसह 4.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या पेनी स्टॉकमधे बंपर तेजी पाहायला मिळत आहे. विकास इकोटेक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 612 कोटी रुपये आहे.

विकास इकोटेक या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.35 रुपये होती. मागील 6 महिन्यांत विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्के नफा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी विकास इकोटेक स्टॉक 7.87 टक्के वाढीसह 4.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जानेवारी 2024 या महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनी सातत्याने आपले कर्ज कमी करत आहे. कंपनीने माहिती दिली की, कर्ज कमी करण्याच्या पूर्वनिर्धारित योजनेनुसार आतापर्यंत कंपनीने 7.5 कोटी रुपये कर्ज बँकांना परतफेड केले आहे.

विकास इकोटेक कंपनीने ऑगस्ट-सप्टेंबर 2021 पासून आपल्या कर्जाची परतफेड करायला सुरुवात केली होती. आतापर्यंत या कंपनीने 126.2 कोटी रुपये कर्जाची रक्कम बँकांना परतफेड केली आहे. आता कंपनीवर काही बँकांचे 35 कोटी रुपये कर्ज शिल्लक आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने आतापर्यंत आपले 78 टक्के कर्जे परतफेड केले आहेत.

विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच वृंदा ॲडव्हान्स्ड मटेरिअल्स लिमिटेड कंपनीच्या मर्जरला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. यासोबतच प्राइस वॉटर हाऊस कूपर्स अँड कंपनी एलएलपी कंपनीची यासाठी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने सेबीला माहिती दिली की, “वृंदा ॲडव्हान्स्ड मटेरियल्स लिमिटेड कंपनीच्या मर्जर प्रस्तावाची तपासणी करण्यासाठी प्राइस वॉटर हाऊस कूपर्स अँड कंपनी एलएलपीला सल्लागार म्हणून नियुक्त करण्याची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे”.

वृंदा ॲडव्हान्स्ड मटेरियल्स लिमिटेड या कंपनीची स्थापना 2007 साली झाली होती. या कंपनीचे उत्पादन केंद्र राजस्थान राज्यात स्थित आहे. ही कंपनी मुख्यतः विशेष पॉलिमर संयुगे, कृषी उत्पादनांचा व्यवसाय करते. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात वृंदा ॲडव्हान्स्ड मटेरियल्स लिमिटेड कंपनीने 192.1 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्यात कंपनीला एकूण 9.35 कोटी रुपये निव्वळ नफा मिळाला होता. वृंदा ॲडव्हान्स्ड मटेरियल्स ही कंपनी पूर्णतः कर्जमुक्त असून कंपनीची एकूण संपत्ती 69.14 कोटी रुपये आहे.

31 ऑगस्ट 2023 रोजी विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत संचालकांनी कंपनीचे अधिकृत भाग भांडवल 200 कोटी रुपयेपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 500 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीने अनेक टप्प्यांत आपले कर्ज कमी करण्याचा प्रयत्न केला असून कंपनी आता कर्जमुक्त होण्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. याचाच सकारात्मक परिणाम कंपनीच्या नफा कमाईवर पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Ecotech Share Price NSE 07 February 2024.

हॅशटॅग्स

#Vikas Ecotech Share Price(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x