24 November 2024 7:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

LIC Share Price | एलआयसी शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर

LIC Share Price

LIC Share Price | मागील काही महिन्यापासून एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. आता या सरकारी कंपनीच्या शेअर्सने 1000 रुपये किमतीचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीचे शेअर्स 1032.45 रुपये किमतीवर पोहचले होते.

तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स आणखी 13 टक्के वाढू शकतात. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाल्यानंतर पहिल्यांदाच 1000 रुपये किमतीच्या पार गेले होते. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी एलआयसी स्टॉक 0.078 टक्के वाढीसह 1,026.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 पासून एलआयसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 67 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी 13 टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. टेक्निकल चार्टवर एलआयसी स्टॉक तेजीचे संकेत देत आहे. या कंपनीत भारत सरकारने एकूण 96.50 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6,47,331 कोटी रुपये आहे. एलआयसी कंपनी सर्वात जास्त बाजार भांडवल असलेली सरकारी कंपनी आहे.

एलआयसी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 530.20 रुपये होती. या कंपनीचा IPO मे 2022 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO साठी शेअरची किंमत बँड 902 ते 949 रुपये निश्चित केली होती. किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने एका शेअरवर 45 रुपये सुट दिली होती. या सरकारी कंपनीच्या IPO चा आकार 21000 कोटी रुपये होता. या कंपनीचा IPO भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO होता. या कंपनीचे शेअर्स सध्या BSE आणि NSE या दोन्ही निर्देशांकावर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE Live 07 February 2024.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x