23 November 2024 7:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Gayatri Highways Share Price | शेअरची किंमत 1 रुपया 50 पैसे! चॉकलेट पेक्षाही स्वस्त, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी

Gayatri Highways Share Price

Gayatri Highways Share Price | गायत्री हायवेज या स्मॉलकॅप कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आजकाल बाजारात 2 रुपये किमतीमध्ये चॉकलेट मिळत नाही, मात्र भरघोस कमाई करून देणारा शेअर सहज मिळतो. गायत्री हायवेज कंपनीचे शेअर्स 2 रुपयेपेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. या पेनी स्टॉकमध्ये FII ने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या तिमाहीमध्ये गायत्री हायवेज लिमिटेड कंपनीमध्ये FII ने 97,74,236 शेअर्स होल्ड केली होते. हे प्रमाण कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 4.08 टक्के होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गायत्री हायवेज कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर मात्र स्टॉकमध्ये किंचित घसरण झाली होती. तर आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी गायत्री हायवेज कंपनीचे शेअर्स 3.45 टक्के वाढीसह 1.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका महिन्यात गायत्री हायवेज कंपनीचे शेअर्स 0.90 पैसे प्रति शेअर किमतीवरून 1.50 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात शेअर्सची किंमत 65 टक्क्यांनी वाढली आहे. मागील सहा महिन्यांत गायत्री हायवेज कंपनीच्या शेअर्सची किंमत 0.85 रुपयेवरून 1.50 रुपये किमतीवर पोहचली आहे. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 75 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावला आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीपर्यंत गायत्री हायवेज कंपनीमध्ये FII ने एकूण 4.08 टक्के भाग भांडवल धारण केले होते. या FII पैकी स्पॅरो एशिया डायव्हर्सिफाइड अपॉर्च्युनिटीज फंडने गायत्री हायवेज कंपनीचे 46,38,900 शेअर्स म्हणजेच जवळपास कंपनीचे 1.94 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. आफरीन डीयाकडे या कंपनीचे 30 लाख शेअर्स आहेत, याचे प्रमाण कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 1.25 टक्के आहेत.

जुलै ते सप्टेंबर 2023 या तिमाहीत देखील FII कडे गायत्री हायवेज कंपनीचे 4.08 टक्के भाग भांडवल होते. या तिमाहीत स्पॅरो एशिया डायव्हर्सिफाइड अनसरटेनटीज फंडने गायत्री हायवेज कंपनीचे 1.94 टक्के भाग भांडवल धारण केले होते..आणि आफ्रीन डियाने या कंपनीचे 1.25 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

गायत्री हायवेज या कंपनीचे 1.50 रुपये किमतीचे स्वस्त शेअर्स बीएसई आणि एनएसई या दोन्ही निर्देशांकावर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 35 कोटी रुपये आहे. गायत्री हायवेज कंपनीच्या शेअर्सची 52-आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 0.55 पैसे होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gayatri Highways Share Price BSE Live 07 February 2024.

हॅशटॅग्स

Gayatri Highways Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x