24 November 2024 3:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

TTML Share Price | शेअर प्राईस 102 रुपये, TTML शेअर्स पुन्हा तेजीत, 2 दिवसात 15% परतावा दिला, नेमकं कारण काय?

TTML Share Price

TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा तेजीत आले आहे. या कंपनीचे शेअर्स बुधवारी 8 टक्के वाढीसह 98.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल कंपनीचे शेअर 92 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

नुकताच कंपनीने आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. तिमाही काळात कंपनीच्या कामगिरीत किंचित सुधारणा झाल्याने शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 7.13 टक्के वाढीसह 102.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डिसेंबर 2023 तिमाहीत टीटीएमएल कंपनीला 307 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. तर सप्टेंबर 2023 तिमाहीत देखील कंपनीचा निव्वळ तोटा 310 कोटी रुपये नोंदवला गेला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत या निव्वळ तोटा 919 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील एका वर्षात टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 27 टक्के वाढली आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 21 टक्के मजबूत झाली आहे.

मागील पाच वर्षांत टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3,268.79 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 2 रुपयेवरून वाढून 109.10 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहचली होती.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 49.80 रुपये होती. 11 जानेवारी 2022 रोजी टीटीएमएल स्टॉक 291.05 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. तर सध्या हा स्टॉक आपल्या लाइफटाईम हाय किमतीच्या तुलनेत 66 टक्के खाली ट्रेड करत आहे.

टीटीएमएल ही कंपनी टाटा टेली सर्व्हिसेस या कंपनीची उपकंपनी असून ती आपल्या मार्केट सेगमेंटमध्ये लीडर म्हणून ओळखली जाते. ही कंपनी मुख्यतः आपल्या ग्राहकांना व्हॉइस आणि डेटा संबंधित सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 18,563.99 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price NSE Live 08 February 2024.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x