22 November 2024 10:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

TRF Share Price | टाटा ग्रुपचा TRF शेअर तुफान तेजीत, 2 दिवसात दिला 40% परतावा, टाटा स्टीलसंबंधित बातमीचा परिणाम

TRF Share Price

TRF Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीआरएफ कंपनीचे शेअर्स रॉकेटच्या वेगाने वर जात आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीआरएफ कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 328.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत.

टीआरएफ कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, या कंपनीने टाटा स्टीलसोबत होणारे विलीनीकरण रद्द केले आहे. कंपनीच्या व्यवसाय कामगिरीत सुधारणा झाल्यामुळे संचालक मंडळाने विलीनीकरण प्रस्ताव रद्द केला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीआरएफ कंपनीचे शेअर्स 273.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी टीआरएफ स्टॉक 19.99 टक्के वाढीसह 393.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टीआरएफ कंपनीने बुधवारी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की, कंपनीने टाटा स्टीलसोबत होणारे विलीनीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या व्यावसायिक कामगिरीमध्ये सुधारणा झाली आहे. ऑर्डर प्लेसमेंट, कॅपिटल इन्फ्युजन, कॉस्ट आणि ॲसेट ऑप्टिमायझेशनमध्ये कंपनीच्या स्वतःच्या प्रयत्नांमुळे सुधारणा पाहायला मिळाली आहे. टीआरएफ कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये टाटा स्टील कंपनीसोबत विलीनीकरण करार संपन्न केला होता. आता टाटा स्टील कंपनीच्या संचालक मंडळाने हे विलीनीकरण रद्द करण्यास मान्यता दिली आहे.

टीआरएफ कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या कोलकाता खंडपीठात विलीनीकरण योजना रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर 2023 मधील शेअरहोल्डिंग डेटानुसार टीआरएफ कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 34.6 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

टाटा स्टील कंपनीने बुधवारी जाहीर केलेल्या निवेदनात माहिती दिली की, एकूण 9 व्यावसायिक युनिटपैकी 3 कंपन्यांची विलीनीकरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचली आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. टाटा स्टील कंपनीने भुवनेश्वर पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, अंगुल एनर्जी लिमिटेड आणि द इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट्स लिमिटेड यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जाहीर केली आहे.

भुवनेश्वर पॉवर ही कंपनी टाटा स्टील कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. तर अंगुल एनर्जी कंपनीमध्ये टाटा स्टील कंपनीने 99.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आणि इंडियन स्टील अँड वायर कंपनीमध्ये टाटा स्टील कंपनीने 98.15 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TRF Share Price NSE Live 08 February 2024.

हॅशटॅग्स

TRF Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x