23 November 2024 8:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

JP Power Share Price | शेअरची किंमत 21 रुपये, 6 महिन्यात दिला 215% परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर

JP Power Share Price

JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 21.94 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.

मागील चार ट्रेडिंग सेशनमध्ये जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 20.75 टक्क्यांनी वाढले आहे. आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स स्टॉक 3.31 टक्के घसरणीसह 21.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील सहा महिन्यांत जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 215 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्के मजबूत झाली आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1,185.29 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 1 रुपये किमतीवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत.

डिसेंबर तिमाहीत जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीने 172.85 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 68.66 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीला 217.97 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, “जेपी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये 21 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट तयार झाला आहे. 26 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक 26 रुपये किमतीच्या पार गेला तर, शेअर 28 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.”

टिप्स 2 ट्रेड्स फर्मच्या मते, “जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. दैनिक टेक्निकल चार्टवर या स्टॉकमध्ये 23.3 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी सध्याच्या किंमत पातळीवर नफा वसुली केली पाहिजे. हा स्टॉक 19 रुपये सपोर्टच्या खाली बंद झाला तर 15.5 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. सेबीने जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स ASM फ्रेमवर्क अंतर्गत ठेवले आहेत. त्यामुळे शेअरमध्ये किंचित घसरण होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Power Share Price NSE Live 09 February 2024.

हॅशटॅग्स

JP Power Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x