22 November 2024 6:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Power Grid Share Price | सरकारी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन शेअर्समध्ये तेजी, डिव्हीडंड सुद्धा मिळणार, पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Power Grid Share Price

Power Grid Share Price | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 287.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी भारत सरकारच्या मालकीची महारत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे.

या कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्टॉक 1.09 टक्के घसरणीसह 273.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डिसेंबर तिमाहीत पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या निव्वळ नफ्यात मजबूत वाढ नोंदवली गेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 10.5 टक्के वाढीसह 4,028 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 3,645.3 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार महसूल संकलनात वाढ झाल्यामुळे कंपनीचा निव्वळ नफा वाढला आहे.

बुधवारी सेबीला दिलेल्या माहितीत पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने सांगितले की, डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीने 11,819.70 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 11,530.22 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कंपनीच्या विद्यमान पात्र शेअरधारकांना 4.50 रुपये प्रति शेअर दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. हा दुसरा अंतरिम लाभांश गुंतवणुकदारांना 5 मार्च 2024 रोजी वाटप केला जाईल.

ब्रोकरेज फर्म सिटीने पॉवर ग्रिड कंपनीच्या शेअरची टार्गेट प्राईस 300 रुपये निश्चित केली आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका महिन्यात पॉवर ग्रिड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 56 टक्के वाढली आहे.

मागील एका वर्षात पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 77 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 289.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 157.88 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,63,346.60 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Power Grid Share Price NSE Live 09 February 2024.

हॅशटॅग्स

Power Grid Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x