23 November 2024 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 7 रुपये! आता कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर्स सुसाट तेजीत येणार?

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. दिवसभराच्या व्यवहारात विकास लाइफ केअर कंपनीचे शेअर्स 7.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. विकास लाइफ केअर लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1130 कोटी रुपये आहे.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.5 रुपये होती. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी विकास लाइफ केअर स्टॉक 0.69 टक्के घसरणीसह 7.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, 8 फेब्रुवारी रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीने विकास गर्ग आणि ॲडविक कॅपिटल लिमिटेड यांच्यासोबत एका कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी शेअर खरेदी करार केला आहे.

विकास लाइफ केअर लिमिटेड ही कंपनी इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड या कंपनीचे 75 लाख शेअर्स म्हणजेच जवळपास कंपनीचे 33.26 टक्के भाग भांडवल खरेदी करणार आहे. IITL कंपनीने ITL Projects Limited कंपनीचे 71.74 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीने म्हटले आहे की, विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनी आयआयटीएल किंवा आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीमधील भाग भांडवल खरेदी करण्यासाठी सेबीच्या नियमांना अनुसरून ओपन ऑफर जाहीर करणार आहे.

इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड कंपनीचे अधिकृत भांडवल 35 कोटी रुपये असून त्यात 10 रुपये दर्शनी मूल्याचे 3 कोटी ईक्विटी शेअर्स आणि 50 लाख प्रेफरंस शेअर्स आहेत. नुकताच विकास लाईफ केअर लिमिटेड कंपनीने नेतृत्व गटात बदल करण्याचा निर्णय घेतला होता.

कंपनीने आपल्या कॉर्पोरेट व्यवस्थापन रचनेनुसार कंपनीची जबाबदारी नवीन टीमकडे सुपूर्द केली आहे. विकास लाइफ केअर कंपनीने UAE मध्ये 10 लाख दिनार अधिकृत भाग भांडवल असलेली विकास लाइफ केअर एलएलसी या नावाची कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीचे 1000 शेअर्स 1000 दिनार या किमतीवर जारी केले जातील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 10 February 2024.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x