24 November 2024 5:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

BEL Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरने 611 टक्के परतावा दिला, आता तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर

BEL Share Price

BEL Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.25 टक्क्यांच्या घसरणीसह 177 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी भारतातील आघाडीची संरक्षण कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.3 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 195 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 90 रुपये होती.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.11 टक्के घसरणीसह 180.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

9 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 131 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी 131 रुपये किमतीवर कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 35 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 86 टक्के नफा कमवून दिला आहे.

15 फेब्रुवारी 2019 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक तब्बल 611 टक्के वाढला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी बीईएल कंपनीचे शेअर्स 22 पैशांवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी 1999 मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 80,741 टक्के वाढले आहे.

ब्रोकरेज फर्म शेअरखानने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 220 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतो. म्हणून तज्ञांनी स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे.

सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 30,000 कोटी रुपयेपेक्षा अधिक आहे. बीईएल ही कंपनी मुख्यतः डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात व्यवसाय करणारी सरकारी कंपनी आहे. ही कंपनी भारताला संरक्षण उत्पादनात स्वावलंबी बनविण्यास हातभार लावत आहे. या कंपनीने इलेक्ट्रॉनिक्ससह इतर अनेक क्षेत्रात विविध प्रकल्पांची उभारणी केली आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही सरकारी कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस लाभांश वाटप करत आली आहे. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 70 टक्के लाभांश वाटप केले होते. भारत सरकारने संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी खाजगी क्षेत्राला देखील आमंत्रित केले असून परकीय OEM कडून मिळणारी तंत्रज्ञान हस्तांतरण व्यवस्था सुलभ केली आहे.

मागील काही वर्षात भारतीय संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीचे आगमन झाले आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, परकीय आयातीवर बंदी घालून मोदी सरकार देशातील संरक्षण उत्पादनात वाढ करत आहे. आणि त्यामुळे भारत अधिक स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. याचा फायदा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सारख्या कंपन्यांना होणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः रडार, सिम्युलेटर, EWS सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक फ्यूज, थर्मल इमेजिंग, इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टीम, बॉर्डर सर्व्हिलन्स सिस्टीम आणि काउंटर ड्रोन सिस्टीम यांच्या निर्मितीचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 10 February 2024.

हॅशटॅग्स

BEL Share Price(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x