23 November 2024 9:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये! आता कंपनीकडून महत्वाची अपडेट आली, पुढे किती फायदा होणार?

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.69 टक्क्यांच्या घसरणीसह 7.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1090 कोटी रुपये आहे.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.70 रुपये होती. आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी विकास लाइफ केअर स्टॉक 3.50 टक्के घसरणीसह 6.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 5 दिवसांत 2 टक्के घसरण नोंदवली होती. मागील एका महिन्यात विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 9 टक्के परतावा कमावून दिला होता. 10 फेब्रुवारी 2024 रोजी विकास लाइफ केअर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संचालकांनी भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. 29 जानेवारी 2024 रोजी कंपनीच्या संचालकांनी पात्र संस्थात्मक प्लेसमेंटद्वारे भांडवल उभारणी करण्यासाठी मंजुरी दिली होती.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक संस्थात्मक प्लेसमेंटने अर्ज केले आहेत. आणि पात्र QIB कडून कंपनीच्या ॲस्ट्रो खात्यांमध्ये रक्कम देखील जमा करण्यात आली आहे. SEBI च्या निर्देशांनुसार, विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने 6.75 रुपये ते 7.08 रुपये प्रति इक्विटी शेअर या फ्लोर प्राईस दरम्यान पात्र संस्थात्मक प्लेसमेंटला गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली होती.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने पात्र संस्थात्मक खरेदीदारांना 7.407 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने हे शेअर्स एजी डायनॅमिक फंड, एमिनेन्स ग्लोबल फंड पीसीसी आणि रेडियंट ग्लोबल फंड यांसारख्या दिग्गज गुंतवणुकदार संस्थांना जारी केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 12 February 2024.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x