Gensol Engineering Share Price | 4 वर्षात 10,000 रुपये गुंतवणुकीवर 5 लाख रुपये परतावा, शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनीअरिंग या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी लागणारे अभियांत्रिकी आणि बांधकाम सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मागील चार वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. जर तुम्ही चार वर्षांपूर्वी जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 लाख रुपये झाले असते.
मागील एका महिन्यात जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 32 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 91 टक्के वाढली आहे. आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 4.83 टक्के वाढीसह 1,165.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीची स्थापना 2012 साली झाली होती. ही कंपनी जेनसोल ग्रुपचा भाग म्हणून ओळखली जाते. जेनसोल इंजिनीअरिंग कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर टर्नकी प्रकल्प व्यवस्थापनात एक्स्पर्ट मानली जाते. मागील काही वर्षांत जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीने 600 MW पेक्षा अधिक क्षमतेचे जमिनीवरील आणि घरांच्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या स्थापन करण्याचे काम केले आहेत. आपल्या व्यवसायाचा विस्तार करत जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीने इलेक्ट्रिक तीनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विकास आणि उत्पादन कामासाठी पुण्यात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती केंद्राची स्थापना केली आहे.
लेटेस्ट शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 62.59 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणुकदारांनी कंपनीचे 37.41 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनीच्या सार्वजनिक गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड आणि परकीय गुंतवणूकदार सामील आहेत. यासह शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांनी देखील कंपनीचे 1.51 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
डिसेंबर 2013 तिमाहीत जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 335 टक्के वाढीसह 227 कोटी रुपये महसुल संकलित केला आहे. तर कंपनीचा EBITDA 312 टक्के वाढून 70 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
जीसीएल ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, “जेनसोल इंजिनीअरिंग स्टॉक सर्व मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर ट्रेड करत असून स्टॉकचा RSI 75 वर आहे. या कंपनीचे शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स घसरून 1,000 रुपये किमतीवर येऊ शकतात. मात्र या स्तरांवर गुंतवणूक करण्याची संधी मिळाल्यास तज्ञांनी 951 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 1,370 रुपये टार्गेट प्राईससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
अरिहंत कॅपिटल फर्मच्या तज्ञांच्या मते,“जेनसोल इंजिनीअरिंग स्टॉक दैनंदिन चार्टवर हायर टॉप, हायर बॉटम फॉर्मेशन तयार करत आहे. हे मजबूत वाढीचे संकेत देत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 1,010 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 1,200 रुपये टारगेट प्राईससाठी गुंतवणूक करावी”.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Gensol Engineering Share Price today on 12 February 2024
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले या शेअरवर, जिओ फायनान्शिअल शेअरबाबत अपडेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK