22 November 2024 8:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! घसरलेल्या टाटा पॉवर शेअर्सची पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर, किती परतावा मिळेल?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबुत वाढीचे संकेत मिळत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर स्टॉक 7 टक्के घसरणीसह 366 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील टाटा पॉवर स्टॉक 4 टक्के घसरणीसह ट्रेड करत होता. मात्र आज या स्टॉकमध्ये किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.041 टक्के वाढीसह 361.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील पाच दिवसांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 10 टक्के घसरली होती. ही घसरण कंपनीच्या डिसेंबर 2023 तिमाही निकालानंतर पाहायला मिळाली होती. डिसेंबर तिमाहीमध्ये टाटा पॉवर कंपनीने काही खास कामगिरी केली नाहीये. डिसेंबर तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 2 टक्के वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीने 1,076 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 1,052 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

टाटा पॉवर कंपनीने डिसेंबर तिमाहीत 14,841 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 14,339 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-डिसेंबर 2023 या काळात टाटा पॉवर कंपनीने 3,235 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीने 2,871 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात टाटा पॉवर कंपनीने एकूण 45,286 कोटी रुपये महसूली कमाई केली आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत टाटा पॉवर कंपनीची अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता 4270 मेगावॅट होती. तर हरित ऊर्जा उत्पादन क्षमता 603.1 कोटी युनिट होती.

अँटिक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉकमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळू शकते. म्हणून टाटा पॉवर स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी 450 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तर नुवामा फर्मच्या तज्ञांनी टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सवर ‘होल्ड’ रेटिंग देऊन 303 रुपये सुधारित टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 412.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 182.45 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,17,684.36 कोटी रुपये आहे. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. टेक्निकल चार्टवर टाटा पॉवर स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 83.7 वर आहे. म्हणजेच हा स्टॉक आता ओव्हरबॉट झोनमध्ये पोहचला आहे. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवस मुव्हिंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 13 February 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x