18 November 2024 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA
x

Quadrant Televentures Ltd Share Price | एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढतोय

Quadrant Televentures Ltd Share Price

Quadrant Televentures Ltd Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली होती. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. दूरसंचार क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 10 टक्के अप्पर सर्किटसह 1.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 2.14 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील वर्षी जुलै 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 0.75 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 44 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 57 टक्क्यांनी वाढली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यापूर्वी क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 100 टक्के वाढले आहे.

डिसेंबर 2023 पर्यंत क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 51.32 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 48.68 टक्के भाग भांडवल धारण केले होते. या कंपनीच्या प्रवर्तक गटात Quadrate Enterprises Ltd आणि Nippon Investment & Finance या गुंतवणुकदार संस्था आणि टेककॅचर इंडिया ही कंपनी सामील आहे. क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीच्या शेअरमध्ये एलआयसी कंपनीने देखील मोठी गुंतवणूक केली आहे. एलआयसी कंपनीने क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीचे 10,76,2205 शेअर्स होल्ड केले आहेत. त्याचप्रमाणे कोटक महिंद्रा बँकेने देखील या कंपनीचे 1,16,98,980 शेअर्स होल्ड केले आहेत.

नुकताच क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीने आपले डिसेंबर 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीच्या महसूल संकलनात 5.89 टक्के घसरण झाली आहे. आणि कंपनीचा निव्वळ तोटा 0.06 टक्के कमी झाला आहे.

या तिमाहीत क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीला 27.63 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. तर मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला 29.53 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. कंपनीच्या तिमाही विक्रीत देखील 33.51 टक्के घट नोंदवली गेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quadrant Televentures Ltd Share Price BSE Live 13 February 2024.

हॅशटॅग्स

Quadrant Televentures Ltd Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x