18 November 2024 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL
x

Dilip Buildcon Share Price | अवघ्या 2 दिवसात दिलीप बिल्डकॉन शेअरने 21% परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत, पुढेही तेजी

Dilip Buildcon Share Price

Dilip Buildcon Share Price | दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिलीप बिल्डकॉन कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 460.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे.

या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने नुकताच गोव्यात 545.4 कोटी रुपये मूल्याचा पूल प्रकल्प पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. आज गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी दिलीप बिल्डकॉन कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के वाढीसह 456.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

भोपाळ स्थित दिलीप बिल्डकॉन कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, गोव्याच्या पंजीम-मंगलोर मार्गावरील NH-17 आणि NH-66 दरम्यान असलेल्या झुआरी नदी ओलांडणाऱ्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दिलीप बिल्डकॉन कंपनीला अभियांत्रिकी आणि बांधकाम संबंधित कामासाठी 545.4 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते, ते कंपनीने पूर्ण केले आहे. 11 एप्रिल 2016 रोजी दिलीप बिल्डकॉन कंपनीला ही ऑर्डर देण्यात आली होती. हा प्रकल्प 2021 पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र COVID-19 मुळे काम पूर्ण करण्याची सुधारित तारीख 31 ऑगस्ट 2023 निश्चित करण्यात आली होती.

नुकताच दिलीप बिल्डकॉन कंपनीने आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. दिलीप बिल्डकॉन कंपनीने चालू आर्थिक वर्षात 2,495.4 कोटी रुपये मूल्याचे चार प्रकल्प पूर्ण केले आहे. त्यात HAM प्रकल्प आणि गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये 570 कोटी रुपये मूल्याचा एक EPC प्रकल्प आहे. दिलीप बिल्डकॉन कंपनीने चालू आर्थिक वर्षात मध्य प्रदेश, राजस्थान आणि गोव्यात सिंचन, पाणीपुरवठा आणि शहरी विकासाच्या कामासंबंधित 2,641.3 कोटी रुपये मूल्याचे प्रोजेक्ट जिंकले आहेत.

आर्थिक वर्ष 2023-24 च्या डिसेंबर तिमाहीत दिलीप बिल्डकॉन कंपनीने 2,571 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर कंपनीचा कर कपाती नंतरचा नफा 95.3 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जो मागील वर्षी याच तिमाहीत 79.5 कोटी रुपये नोंदवला गेला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या PAT मध्ये 19.87 टक्के वाढ झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Dilip Buildcon Share Price NSE Live 15 February 2024.

हॅशटॅग्स

Buildcon Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x