24 November 2024 5:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Sakuma Share Price | शेअरची किंमत 27 रुपये, एका महिन्यात दिला 30 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या

Sakuma Share Price

Sakuma Share Price | साकुमा एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर्स मागील चार दिवसांपासून तेजीत वाढत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साकुमा एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर्स 6.7 टक्क्यांच्या वाढीसह 29.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

या कंपनीच्या शेअर्समध्ये होणारी वाढ डिसेंबर तिमाहीच्या उत्कृष्ट निकालामुळे निर्माण झाली होती. मात्र आज गुंतवणूकदारांनी जोरदार नफा वसुली सुरू केली आहे. आज शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी साकुमा एक्सपोर्ट्स स्टॉक 3.19 टक्के घसरणीसह 27.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीत साकुमा एक्सपोर्ट्स या स्मॉल-कॅप कंपनीने सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत 146 टक्के वाढीसह 7,699.5 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. सप्टेंबर तिमाहीत या कंपनीने 3,123.3 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत साकुमा एक्सपोर्ट्स कंपनीने 62 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील तिमाहीत कंपनीने 25 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 150 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

मागील एका महिन्यात साकुमा एक्सपोर्ट्स या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सची किंमत 21.65 रुपयेवरून वाढून 29.20 रुपये किमतीवर गेली आहे. म्हणजेच मागील एका महिन्यात साकुमा एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 18.95 रुपयेवरून वाढून 29.20 रुपये किमतीवर पोहचले होते.

मागील एका वर्षात साकुमा एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळजवळ दुप्पट केले आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 14.05 रुपयेवरून वाढून 29.20 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE या दोन्ही निर्देशांकावर ट्रेड करत आहेत. साकुमा एक्सपोर्ट्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 654 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 29.20 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.40 रुपये होती. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 44 रुपये आणि मध्यम मुदतीत 57 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sakuma Share Price NSE BSE Live 16 February 2024.

हॅशटॅग्स

Sakuma Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x