5 November 2024 10:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

NHPC Share Price | एनएचपीसी शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्वस्त झालेला मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा?

NHPC Share Price

NHPC Share Price | नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच एनएचपीसी या जलविद्युत ऊर्जा उत्पादक सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील सात ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स जवळपास 28 टक्के कमजोर झाले आहे. 5 फेब्रुवारी 2023 रोजी एनएचपीसी कंपनीचे शेअर्स 115.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवार दिनांक 14 फेब्रुवारीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 83 रुपये नीचांक किंमत पातळीवर आले होते.

आज शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी एनएचपीसी या सरकारी कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के वाढीसह 92.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील तीन ट्रेडिंग सेशनमध्ये एनएचपीसी कंपनीच्या शेअर्समध्ये 14 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरगुंडी डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाल्यापासून पाहायला मिळत आहे. या कंपनीने आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल 12 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर केले होते.

डिसेंबर 2023 तिमाहीत एनएचपीसी कंपनीच्या निव्वळ नफ्यात 26.77 टक्के घट पाहायला मिळाली आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा नफा 26.77 टक्के घसरून 491.90 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षांत याच तिमाही कालावधीत कंपनीने 671.67 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत एनएचपीसी कंपनीच्या महसूल संकलनात 20.42 टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही काळात कंपनीने 2,055.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

एनएचपीसी कंपनीचे शेअर्स आपल्या 5 दिवस, 10 दिवस आणि 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2024 या नवीन वर्षाच्या सुरुवातीला एनएचपीसी स्टॉकची किंमत 33.70 टक्क्यांनी वाढली होती. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 89,903 कोटी रुपये आहे. तांत्रिकदृष्ट्या एनएचपीसी स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 51.4 अंकवर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाहीये.

जेएम फायनान्शियल फर्मच्या तज्ञांच्या मते, एनएचपीसी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 91 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तर कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, एनएचपीसी स्टॉक पुढील काळात 60 रुपये किंमतीपर्यंत घसरू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NHPC Share Price NSE Live 16 February 2024.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x