23 November 2024 2:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Taparia Tools Share Price | शेअरची किंमत 3 रुपये, तब्बल 200 टक्के डिव्हीडंड जाहीर, शेअर तेजीत परतावा देतोय

Taparia Tools Share Price

Taparia Tools Share Price | टापरिया टूल्स या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. टापरिया टूल्स या मायक्रो-कॅप कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह 3.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

या कंपनीने नुकताच आपल्या गुंतवणुकदारांना डिव्हिडंड वाटप करण्याची घोषणा केली आहे. या पेनी स्टॉक कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना तब्बल 20 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी टापरिया टूल्स स्टॉक 3.06 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

नुकताच टापरिया टूल्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी आपल्या शेअर धारकांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 200 टक्के म्हणजेच 20 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून 24 फेब्रुवारी 2024 हा दिवस निश्चित केला आहे.

डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत टापरिया टूल्स कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 46.24 टक्के वाढीसह 28.21 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. डिसेंबर 2022-23 ला संपलेल्या तिमाहीत या कंपनीने 19.29 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर तिमाहीत या कंपनीची विक्री 193.32 कोटी रुपयेवरून 7.89 टक्के वाढून 208.58 कोटी रुपये नोंदवली गेली आहे.

टापरिया टूल्स कंपनीचे शेअर्स 2.10 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण करत आहेत. तर स्टॉकमध्ये 3.06 रुपये किमतीवर मजबूत रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 7 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Taparia Tools Share Price NSE Live 16 February 2024.

हॅशटॅग्स

Taparia Tools Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x