23 November 2024 12:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

HDFC Bank Share Price | सुवर्ण संधी! एचडीएफसी बँक शेअर तब्बल 50 टक्के परतावा देईल, फायदा घेणार?

HDFC Bank Share Price

HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीने एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज हाऊसने एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर 2110 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. म्हणजेच या बँकेचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 50 टक्के अधिक वाढू शकतात.

HDFC बँकेच्या व्यवस्थापन मंडळाने माहिती दिली की, 31 डिसेंबर 2023 पर्यंत बँकेच्या व्यवसायात वार्षिक आधारावर स्थिर आणि सकारात्मक दुहेरी अंकी वाढ नोंदवली गेली आहे. मागील एका वर्षात एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 15 टक्के घसरण झाली होती. शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी एचडीएफसी बँकेचे शेअर्स 0.21 टक्के वाढीसह 1,417.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

16 फेब्रुवारी 2023 रोजी एचडीएफसी बँकेचे शेअर्स 1664.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 16 फेब्रुवारी 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 1411.80 रुपये किमतीवर पोहचले होते. म्हणजेच मागील एका वर्षात एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 17 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. तर YTD आधारे एचडीएफसी बँकेच्या शेअर्सची किंमत 16 टक्के घसरली आहे. एचडीएफसी बँके च्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1757.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1363.45 रुपये होती.

मागील 20 वर्षांत एचडीएफसी बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3600 टक्के परतावा कमावून दिला आहे. 13 फेब्रुवारी 2004 रोजी एचडीएफसी बँकेचे शेअर्स 37.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 1411.80 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. मागील 10 वर्षांत एचडीएफसी बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 325 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात बँकेचे शेअर्स 332.40 रुपयेवरून वाढून 1411.80 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 5 वर्षात एचडीएफसी बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HDFC Bank Share Price NSE Live 17 February 2024.

हॅशटॅग्स

#HDFC Bank Share Price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x