23 November 2024 6:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

NECC Share Price | 2 रुपयाच्या शेअरने अल्पावधीत 50,000 रुपयांचे झाले 5.66 लाख रुपये, स्वस्त शेअर खरेदी करणार?

NECC Share Price

NECC Share Price | नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एनईसीसी या वाहतूक सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 46.25 लाख इक्विटी वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वॉरंट पुढील काळात शेअर्समध्ये रूपांतरित करता येतील. नुकताच एनईसीसी कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीने 32.05 रुपये किमतीचे वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे दर्शनी मुल्य 10 रुपये असेल. यातून कंपनी 14.82 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे.

डिसेंबर 1984 साली स्थापन झालेल्या एनईसीसी कंपनीने मागील 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1000 टक्क्यांनी वाढवले आहे. शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी एनईसीसी स्टॉक 1.23 टक्के वाढीसह 32.90 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

25 मार्च 2020 रोजी एनईसीसी कंपनीचे शेअर्स 2.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 15 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 32.50 रुपये किमतीवर पोहचले होते. अशा प्रकारे मागील 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1032 टक्के वाढवले आहे. जर तुम्ही मार्च 2020 मध्ये हा कंपनीच्या शेअर्समध्ये 50,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.66 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 11.32 लाख रुपये झाले असते.

16 फेब्रुवारी 2024 रोजी एनईसीसी कंपनीचे शेअर्स जवळपास 1 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 311 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2023 च्या अखेरीस कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 52.67 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 47.33 टक्के भाग भांडवल धारण केले होते. एनईसीसी कंपनीचे शेअर्स ऑगस्ट 2012 मध्ये BSE निर्देशांकावर आणि मार्च 2016 मध्ये NSE निर्देशांकावर सूचीबद्ध झाले होते.

एनईसीसी ही कंपनी भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये वाहतूक सेवा प्रदान करण्याचे काम करते. या कंपनीच्या सेवांमध्ये स्मॉल पार्सल बुकिंग, संपूर्ण ट्रक्लोड कन्साईनमेंट, प्रोजेक्ट कन्साईनमेंट, ओव्हर डायमेंशनद कन्साईनमेंट यासारख्या सेवांचा समावेश होते. ही कंपनी कंटेनर कार्गो हालचाल, गोदाम, पॅकिंग सेवा देखील प्रदान करते. या कंपनीच्या एकूण 200 पेक्षा जास्त शाखा कार्यरत आहेत.

मागील 1 वर्षात एनईसीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 47 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. डिसेंबर 2023 च्या तिमाहीत एनईसीसी कंपनीने वार्षिक आधारावर 2.51 कोटी रुपये नफा कमावला होता. मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत कंपनीने 2.13 कोटी रुपये नफा कमावला होता. या तिमाहीत कंपनीने एकूण 85.68 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत कंपनीने 72.49 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NECC Share Price NSE Live 17 February 2024.

हॅशटॅग्स

NECC Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x