23 November 2024 11:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला, शेअर्स अजून तेजीत येणार, अपडेट जाणून घ्या

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीने नुकताच माहिती दिली आहे की, कंपनीला REC पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी कंपनीकडून जलपुरा खुर्जा पॉवर ट्रान्समिशन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 838 कोटी रुपये मूल्याचे एलओआय जारी करण्यात आले आहे.

स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये, टाटा पॉवर कंपनीने कळवले की, REC पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेड या सरकारी महारत्न दर्जा प्राप्त असलेल्या कंपनीने जलपुरा खुर्जा पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हीकल संबंधित कामाचे 838 कोटी रुपये मूल्याचे एलओआय जारी केले आहे. शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.75 टक्के घसरणीसह 376 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

कमर्शियल ऑपरेशन सुरू करण्याच्या नियोजित तारखेपासून 35 वर्षांपर्यंत, म्हणजेच SPV संपादनाच्या तारखेपासून 18 महिने ट्रान्समिशन सेवा प्रदान करण्यासाठी ‘बांधा-मालकी घ्या-चालवा-हस्तांतरण करा’ या तत्त्वावर प्रकल्प विकसित केला जाणार आहे. आरईसी लिमिटेड कंपनीची उपकंपनी असेलल्या आरईसीपीडीसीएल ही कंपनी ट्रान्समिशन लाइन प्रकल्प आणि री-बंडलिंग प्रकल्पांमध्ये स्पर्धात्मक लिलावासाठी बोली प्रक्रिया समन्वयक म्हणून काम करणार आहे.

आरईसी लिमिटेड ही कंपनी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आहे. नुकताच या कंपनीला भारत सरकारकडून महारत्न दर्जा देण्यात आला होता. ही कंपनी मुख्यतः इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंगचे काम करते.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर स्टॉक 0.75 टक्क्यांच्या घसरणीसह 376 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 412.90 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 83.68 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 17 February 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x