22 November 2024 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही
x

Gold Rate Today | बापरे! 2024 मध्ये सोन्याचे भाव इतके महाग होणार, प्रति तोळा खिशाला इतका आर्थिक फटका बसणार

Gold Rate Today

Gold Rate Today | सोने नेहमीच चांगला परतावा देत आले आहे. त्यामुळे 2024 मध्येही सोन्याच्या गुंतवणुकीतून चांगली कमाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांचे मत पाहिले तर 2024 मध्ये सोन्याच्या किंमतीत लक्षणीय वाढ होऊ शकते. जाणून घेऊया सोन्याच्या दराबाबत तज्ज्ञांचे काय मत आहे.

जाणून घ्या 2024 मध्ये सोनं किती महाग होऊ शकतं
तज्ज्ञांच्या मते 2024 मध्ये सोन्याच्या किंमतीत लक्षणीय वाढ होईल. मात्र, विविध तज्ज्ञांची मते वेगवेगळी आहेत.

१. कॉमट्रेंड्ज रिसर्चचे संचालक ज्ञानशेखर त्यागराजन यांच्या मते, 2024 मध्ये सोने 70,000 रुपये प्रति दहा ग्रॅमची पातळी दर्शवू शकते.
२. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष सैय्याम मेहरा यांच्या मते, 2024 मध्ये सोन्याची किंमत 68,000 ते 70,000 रुपयांपर्यंत असू शकते.
३. ट्रेडबुल्स सिक्युरिटीजनुसार, सोन्याचा भाव 66,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.
४. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, सोन्याचा दर 67,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
५. मोतीलाल ओसवाल यांच्या म्हणण्यानुसार, 10 ग्रॅमची किंमत 66,000 रुपयांची पातळी दर्शवू शकते.
६. एसएमसी ग्लोबल गोल्ड रेट 68,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.

2024 मध्ये चांदीचा दर किती वाढेल?
मजबूत औद्योगिक मागणीमुळे गुंतवणूकदार चांदीकडे आकर्षित राहतील. चांदीचा दर 26 डॉलर प्रति औंस किंवा 78,500 रुपये प्रति किलोच्या वर गेला तर तो 85,000 ते 88,000 रुपये प्रति किलोपर्यंत पातळी दर्शवू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या आठवडाभरात सोनं किती महागलं
शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,624 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर सोमवारी सोन्याचा भाव 62512 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. त्यामुळे आठवडय़ात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 112 रुपयांनी वधारून बंद झाला.

तर चांदीच्या दरातही गेल्या आठवड्यात वाढ झाली होती. गेल्या आठवड्यात शुक्रवारी चांदीचा भाव 70638 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. तर चांदीचा हा दर सोमवारी 70417 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. त्यामुळे आठवडय़ात चांदीचा दर प्रति किलो २२१ रुपयांनी वधारून बंद झाला.

आज सोने-चांदीचे भाव उच्चांकी दरांपेक्षा किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा सुमारे 828 रुपये प्रति 10 ग्रॅम ने स्वस्त आहे. 28 डिसेंबर 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली. त्या दिवशी सोन्याचा भाव 63452 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तर चांदी अजूनही 6296 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 30 नोव्हेंबर 2023 रोजी चांदीने 76934 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 18 February 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x