23 November 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, मिळेल मजबूत परतावा, आता नवीन सकारात्मक अपडेट आली

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 385.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 376.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

नुकताच टाटा पॉवर कंपनीला REC पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेड कंपनीने Jalpura Khurji Power Transition Limited प्रोजेक्टच्या अधिग्रहणासाठी लेटर ऑफ इंटेंट जारी केले आहे. आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.13 टक्के वाढीसह 381 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

16 फेब्रुवारी रोजी टाटा पॉवर कंपनीने सेबीला माहिती दिली की, REC पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेड, या REC लिमिटेड कंपनीच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीने जलपुरा खुर्जा पॉवर प्रोजेक्ट खरेदी करण्यासाठी इरादा पत्र जारी केले आहे. टाटा पॉवरने सांगितले की, या प्रकल्पाचे मूल्य 838 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टाटा पॉवर कंपनी 2028-29 पर्यंत 15,000 कोटी रुपये गुंतवणुकीसह 2,800 मेगावॅट क्षमतेचे पंप हायड्रो स्टोरेज प्रकल्प उभारणार आहे.

टाटा पॉवर कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत दोन टक्के वाढीसह 1,076 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 1,052 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. टाटा पॉवर कंपनीने या तिमाहीत 14,841 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 14,339 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 20 February 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x