23 November 2024 3:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये जोरदार तेजीचे संकेत, भरघोस कमाईसाठी पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. 16 फेब्रुवारी 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 441 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 938 रुपये किमतीवर पोहचले होते.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअरधारकांचे पैसे 112 टक्के वाढवले आहे. आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के घसरणीसह 927.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 1 महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 36 टक्के वाढवले आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 950 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 400 रुपये होती. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी, गुंतवणूकदारांना टाटा मोटर्स कंपनीचे खरेदी करताना 890 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावून गुंतवणूक 975 रुपये टार्गेट प्राईससाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकमध्ये सतत तेजी पाहायला मिळत आहे. ऑटो स्पेसमध्ये या कंपनीचे शेअर्स आपल्या सार्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. टेक्निकल चार्टवर हा स्टॉक हायर लोअर फॉर्मेशन तयार करत आहे. या स्टॉकचा दैनिक RSI 74.3 वर पाहायला मिळत आहे. दैनिक चार्टवर टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 30, दिवस, 50 दिवस आणि 100 दिवसाच्या मुव्हिंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 20 February 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x