14 December 2024 11:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळेल, GMP चे संकेत

IPO GMP

IPO GMP | जेनिथ ड्रग्स कंपनीच्या IPO ला रिटेल गुंतवणूकदारांनी मजबूत प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या कंपनीच्या IPO ला ओपनिंगच्या दुसऱ्या दिवशी 2.12 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले आहे. या कंपनीचा IPO 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. जेनिथ ड्रग्स कंपनीच्या IPO मधील किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 6 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर NII साठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 80 टक्के सबस्क्राईब झाला आहे. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 15 रुपये प्रीमियमवर ट्रेड करत आहेत.

जेनिथ ड्रग्स कंपनीच्या IPO मध्ये 40.60 कोटी रुपये मूल्याचे 51.4 लाख शेअर्स जारी केले जाणार आहेत. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 75-79 रुपये निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार एका लॉट अंतर्गत 1600 शेअर्स खरेदी करू शकतात. या कंपनीच्या IPO मध्ये 50 टक्के कोटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर 35 टक्के कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. उरलेला 15 टक्के कोटा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल.

जेनिथ ड्रग्स कंपनी या पब्लिक ऑफरमधून जमा होणारी रक्कम मशिनरी खरेदी आणि नवीन प्लांट उभारण्यासाठी, तसेच विद्यमान मॅन्युफॅक्चरिंग ब्लॉक्स अपग्रेड करण्यासाठी, खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंची पूर्तता करण्यासाठी खर्च करणार आहे. जेनिथ ड्रग्स ही कंपनी एक प्रतिष्ठित फार्मास्युटिकल कंपनी आहे. ही कंपनी विविध फॉर्म्युलेशनच्या पोर्टफोलिओसह, रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी औषधांचे उत्पादन करते.

सध्या जेनिथ ड्रग्स कंपनीकडे 600 पेक्षा जास्त औषधे उत्पादन करण्याची FDA मान्यता आहे. 600 उत्पादनांपैकी 325 उत्पादने नियमितपणे बनवली केली जात आहेत. भारतीय फार्मास्युटिकल उद्योगात मागील नऊ वर्षांपासून 9.43 टक्के CAGR दराने वाढ पाहायला मिळत आहे. सध्या औषध उत्पादनात भारत देश जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाही कालावधीत जेनिथ ड्रग्स कंपनीने 69.48 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, त्यात कंपनीचा निव्वळ नफा 5.4 कोटी रुपये होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP for investment 21 February 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(153)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x