24 November 2024 4:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

जरांगेचे सहकारी? नाही!...शिंदे-फडणवीस सरकारमधील सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्याचे मनोज जरांगेवर 'स्क्रिप्टेड' आरोप

Ajay Maharaj Baraskar

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांना पाणी पाजू देण्याची संधी न लाभल्याने प्रसिद्धीपासून वंचित राहिलेले त्यांचे मित्र आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांप्रमाणे वर्तन करणारे किर्तनकार अजय महाराज बरासकर यांनी आज मनोज जरांगे यांच्यावर मोठे आरोप केले. पण समाज माध्यमांवर अजय बारस्कर यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, यावरून राज्य सरकारवर देखील नेटिझन्स संशय व्यक्त करताना दिसत आहेत.

अजय महाराज बारसकर यांनी खुलासे करत जरांगेंवर टीकास्त्र डागले. मनोज जरांगे यांनी मराठा कुटुंबांना उध्वस्त केले आहे, अशी घणाघाती टीका अजय महाराज बारसकर यांनी केली. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मात्र बारसकर यांची संपूर्ण शैली ही एखाद्या राजकीय पक्षातून फुटलेल्या आमदार किंवा खासदारासारखी होती हे स्पष्ट दिसत होतं. तसेच एवढं मोठं आंदोलन म्हटल्यावर बैठका तर होणारच हे स्पष्ट असताना, त्यांनी ‘गुप्त बैठका’ असे शब्दप्रयोग करून स्वतःचं हसू करून घेतलं आहे. पण त्याच मनोज जरांगेंसोबत माध्यमांच्या समोर आमदार बच्चू कडू यांनी जाहीर बैठक घेतल्याचा त्यांना विसर पडला होता. कारण अजय बारसकर हे स्वतः प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं
दरम्यान, आता अजय बारसकर यांनी केलेल्या टीकेला मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “माझ्यावर असे आरोप रॅलीच्या आधीच होणार होते पण तो ट्रॅप फसला. अजय बारसकर हा बांधावरून उठला आणि महाराज झाला. तो भोंदू महाराज असून याच्या मागे कोणते नेते आणि मंत्री हे मला माहिती आहे.

मी मराठा समाजासाठी कट्टर, बारसकर हा हेकेखोर आहे. सरकारने हे असे ट्रॅप लावणं बंद करावं नाहीतर याच्यापेक्षा आणखी जड जाईल. प्रत्येकाला सांगितलं होतं की ज्याला मध्यस्थी करायची त्याने स्वत:चा स्वार्थ पाहू नका. सरकारचा हा ट्रॅप असून मला बाजूला करण्यासाठी हे सर्व एकत्र माझ्याविरोधात भिडवणार आहेत. तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट असल्याचा घणाघातही जरांगे पाटील यांनी बारसकर यांनी केलेल्या आरोपांवरून केला.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे सहकारी बच्चू कडू सावध झाले?
अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांना प्रहार जनशक्ती पक्षातून निलंबित करण्यात आले आहेत. पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ही कारवाई केली आहे. बारस्कर यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. पक्षाचा जरांगे यांना पाठिंबा असताना वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसेच बारस्कर यांच्या विधानाशी पक्ष सहमत नाही, पक्षाची ती अधिकृत भूमिका नसल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

News Title : Prahar Janshakti leader Ajay Maharaj Baraskar allegations on Manoj Jarange 21 February 2024.

हॅशटॅग्स

#Manoj Jarange(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x