22 November 2024 9:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Alpex Solar Share Price | कुबेर कृपा असणारा शेअर! अवघ्या 5 दिवसात दिला 265 टक्के परतावा, खरेदी करणार हा शेअर?

Alpex Solar Share Price

Alpex Solar Share Price | नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या अल्पेक्स सोलर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 419.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. अल्पेक्स सोलर कंपनीचा IPO 8 फेब्रुवारी 2024 ते 12 फेब्रुवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी अल्पेक्स सोलर स्टॉक 5.01 टक्के घसरणीसह 392.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अल्पेक्स सोलर कंपनीचे शेअर्स आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 265 टक्के मजबूत झाले होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या IPO मध्ये 115 रुपये या अप्पर प्राईस बँडवर वाटप करण्यात आले होते. 15 फेब्रुवारी 2024 रोजी अल्पेक्स सोलर कंपनीचे शेअर्स 329 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. सूचीबद्ध झाल्यानंतर लगेचच अल्पेक्स सोलर स्टॉक 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 345.45 रुपये किमतीवर पोहचला होता. 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 419.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. IPO इश्यू किमतीच्या तुलनेत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 265 टक्के परतावा कमावून दिला आहे.

अल्पेक्स सोलर कंपनीचा IPO एकूण 324.03 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 351.89 पट सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 502.31 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 141.48 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. एका लॉटमध्ये कंपनीने 1200 शेअर्स ठेवले होते. अल्पेक्स सोलर या कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alpex Solar Share Price NSE Live 22 February 2024.

हॅशटॅग्स

Alpex Solar Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x