23 November 2024 2:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 18 रुपये! कंपनीकडून फायद्याची अपडेट येताच शेअर्समध्ये तेजी, टार्गेट प्राइस जाहीर

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. अशीच काहीशी तेजी आज देखील पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षापासून व्होडाफोन आयडिया कंपनी आर्थिक समस्यांना तोंड देत आहे. कंपनीवर खूप मोठी कर्जाचे डोंगर निर्माण झाले आहे, जे आता कंपनीच्या समस्येत भर घालत आहेत.

नुकताच व्होडाफोन आयडिया कंपनीचे अतिरिक्त संचालक कुमार मंगलम बिर्ला यांनी एक मोठे वक्तव्य केले. आणि शेअरमध्ये पुन्हा जोरदार खरेदी सुरू झाली. आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 10.43 टक्के वाढीसह 18 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हंटले की, ते व्होडाफोन आयडिया कंपनीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांनी दूरसंचार व्यवसायातून बाहेर पडण्यास नकार दिला. कुमार मंगलम बिर्ला यांनी व्होडाफोन आयडिया कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर 15.50 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 6.51 टक्क्यांच्या वाढीसह 16.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 132 टक्के परतावा कमावून दिला आहे.

सेबीला दिलेल्या माहितीत व्होडाफोन आयडिया कंपनीने कळवले आहे की, 27 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक भांडवल उभारणीबाबत चर्चा करणार आहेत.

गुरुवारी कुमार मंगलम बिर्ला यांनी स्पष्टपणे सांगितले की कंपनी आपल्या व्यवसायातून बाहेर पडणार नाही. आणि कंपनी नवीन गुंतवणूकदारांना जोडून पुन्हा आपल्या व्यवसायात प्रगती करेल. तज्ञांच्या मते, जर व्होडाफोन आयडिया कंपनीचा शेअर 18 रुपये किमतीच्या पार गेला तर, शेअर 25 रुपये किंमत स्पर्श करेल. तज्ञांनी गुंतवणूक करताना 13.50 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 23 February 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x