22 November 2024 1:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मोटार वाहन सुधारणा विधेयक २०१९; वाहन धारकांना रोज १०-१५ हजार खिशात ठेवावे लागतील

Nitin Gadkari, Minister Nitin Gadkari, Narendra Modi, new motor vehicles amendment bill 2019, BJP

नवी दिल्ली : वाहन धारकांना धडकी भरवणारे दंड अमलात आणण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी काल लोकसभेत मोटार वाहन सुधारणा विधेयक-२०१९ सादर केले. दरम्यान रस्ते अपघात थांबविण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचावा म्हणून मोटार वाहन सुधारणा विधेयक मंजूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन देखील नितीन गडकरी यांनी उपस्थित प्रतिनिधींना केले आहे. मागील पाच वर्षात देशातील एकूण अपघातांचे प्रमाण कमी करण्यास आम्ही कमी पडलो हे देखील त्यांनी प्रथम मान्य केलं.

त्यामुळे या विभागाची जबाबदारी माझी असून मी ती स्वीकारत असल्याचे देखील गडकरी म्हणाले. दरम्यान सदर विषयाला अनुसरून सभागृहाला संबोधित करताना गडकरी म्हणाले, ‘लोकांना दंडाचा धाक सध्या उरलेला नाही’ अशी प्रस्तावना करत वाहतूक दंडांच्या रकमेत प्रचंड वाढ प्रस्तावित केली. लोकसभेत हे विधेयक नव्याने मांडण्यात आले असून विधेयक अधिकृतरीत्या पारित करण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. यापूर्वी हे विधेयक २०१७ मध्ये लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. परंतु, राज्यसभेत मंजूर झाले नव्हते. या विधेयकात अनेक शिफारसी असून नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईची शिफारस आहे. जाणून घेऊयात यातील काही दंडात्मक कारवाईच्या नेमक्या शिफारसींबाबत…

  1. कार चालवताना सीट-बेल्ट लावला नाही किंवा बाईकवर हेल्मेट घातले नसेल तर सध्याचा १०० रुपये दंड थेट १००० रुपये करण्यात आला आहे.
  2. अतिवेगाने गाडी चालवाल तर सध्याच्या ५०० रुपयांऐवजी ५००० रुपये दंड भरावा लागेल.
  3. वाहतुकीच्या वेळेत तुम्ही रुग्णवाहिकेला जाण्यास जागा दिली नाही तर १०००० रुपयांचा दंड
  4. यापुढे ड्रायव्हींग लायसन्ससाठी आधार नंबर सक्तीचा करण्यात येईल.
  5. सध्या लायसन्स २० वर्षांसाठी मिळते. हा कालावधी १० वर्षांवर आणण्यात येणार
  6. वय वर्ष ५५ पुढील लोक हे लायसन्स नुतनीकरणासाठी आणतील तेव्हा ते ५ वर्षांसाठीच दिले जाईल
  7. सर्व राज्यांत वाहन परवाना, वाहन नोंदणी या प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवर नोंदणीकृत करण्याची सूचना
  8. मोटार अपघातात मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये भरपाई देण्याची तरतूद
  9. विना पॉलिसी वाहन चालवल्यास २००० रुपयांचा दंड
  10. ओव्हरलोडिंगवर २० हजार रुपयांचा दंड, सीट बेल्ट न बांधल्यास १० हजार रुपयांचा दंड

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x