23 April 2025 3:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर देऊ शकतो मोठा परतावा, या कंपनीला मोठा भविष्यकाळ - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार; मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: SUZLON
x

आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला

Dalit Panther, Raja Dhale, RPI, Ambedkar Chalwal

मुंबई : दलित पँथरचे संस्थापक आणि ज्येष्ठ विचारवंत, तसेच आंबेडकरी चळवळीचे नेते राजा ढाले यांचे आज राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. उद्या दि. १७ जुलैला दुपारी १२ च्या सुमारास ढाले यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवासस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान राजा ढाले यांच्या निधनाने सर्वच स्थरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यानिमित्त अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एनसीपीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील राजा ढाले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दलित पँथर चे संस्थापक ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे आज राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला. भावपूर्ण श्रद्धांजली. अशा भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या