23 November 2024 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT
x

Adani Green Share Price | 5720% परतावा देणारा मल्टिबॅगर अदानी ग्रीन शेअर तेजीत, पुढेही मल्टिबॅगर परतावा मिळणार?

Adani Green Share Price

Adani Green Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. डिसेंबर तिमाहीत अदानी समूहाच्या जवळपास सर्व कंपन्यानी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मागील वर्षी जानेवारी 2023 मध्ये यूएस शॉर्ट-सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने एक वादग्रस्त अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर अदानी समुहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स क्रॅश झाले होते.

आता मात्र या सर्व कंपन्यांनी जबरदस्त सुधारणा केली आहे. यात कतार गुंतवणूक प्राधिकरण आणि GQG पार्टनर कंपनीने जबरदस्त आधार दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 3.80 टक्के वाढीसह 1,967 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील तीन महिन्यात अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 1,052 रुपयेवरून वाढून 1,967 रुपये किमतीवर पोहोचले आहे. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 82 टक्के परतावा कमावला आहे. मागील एका वर्षात अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 295 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5720 टक्के नफा कमावून दिला आहे.

14 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने घोषणा केली की, कंपनीने खवरा, गुजरात येथे 551 मेगावॅट सौर क्षमतेचा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून राष्ट्रीय ग्रीडला वीजपुरवठा करायला सुरुवात झाली आहे. खवरा आरई पार्कचे काम सुरू केल्यानंतर अवघ्या 12 महिन्यांत अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने हा प्लांट सुरू करून त्याला राष्ट्रीय ग्रीडसोबत जोडले आहे.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने या RE पार्कमधून 30 GW अक्षय ऊर्जा निर्माण करण्याची योजना आखली आहे. ही नियोजित क्षमता पुढील पाच वर्षांत विकसित होणे अपेक्षित आहे. याचे सर्व काम पूर्ण झाल्यावर, खवरा आरई पार्क जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा निर्मिती प्रकल्प बनेल. या आरई पार्कमधून वार्षिक 16.1 दशलक्ष घरांना वीज पुरवठा केला जाईल. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीकडे सध्या 9 GW पेक्षा जास्त क्षमतेचे अक्षय ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे.

भारत सरकारच्या डीकार्बोनायझेशनच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने 2030 पर्यंत 45 GW स्वच्छ ऊर्जा निर्मिती करण्याचे हे अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे लक्ष्य आहे. ग्लोबल क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजने अदानी ग्रीन एनर्जी कंपनीची रेटिंग अपग्रेड करून ‘स्थिर’ केले आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनी या वर्षी आपल्या देय कर्जाची परतफेड करण्यासाठी US बाँडद्वारे 409 दशलक्ष डॉलर्स भांडवल उभारण्याची योजना आखत आहे. हिंडनबर्ग अहवाल जाहीर झाल्यानंतर कंपनीने जारी केलेले हे पहिले परकीय बॉण्ड्स असतील.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 148.54 टक्के वाढून 256 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने 103 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने डिसेंबर तिमाहीत 1,765 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी कंपनीने याच तिमाहीत 1,258 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. म्हणजेच कंपनीच्या वार्षिक महसूल संकलनात 40.30 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Share Price NSE Live 01 March 2024.

हॅशटॅग्स

#Adani Green Share Price(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x