22 November 2024 11:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Brightcom Share Price | करोडपती करणारा ब्राइटकॉम ग्रुप शेअर 17 रुपयांवर आला, खरेदी करावा? नवीन अपडेट आली

Brightcom Share Price

Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्के घसरणीसह 16.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये विक्री पाहायला मिळत आहे.

28 फेब्रुवारी 2024 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्स वाटपात अनियमितता केल्याचा आरोप असलेले कंपनीचे प्रवर्तक सुरेश कुमार रेड्डी यांच्यावरील निर्बंध उठवण्यास सेबीने नकार दिला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण सुरू झाली होती. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के घसरणीसह 17.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सेबीने सुरेश कुमार रेड्डी यांना कोणत्याही सूचीबद्ध कंपनी किंवा कोणत्याही उपकंपन्यांमध्ये संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय पद किंवा नोकरी करण्यावर बंदी घातली होती. सेबीने 22 ऑगस्ट 2023 रोजी जारी केलेल्या अंतरिम आदेशात म्हंटले होते की, 28 फेब्रुवारी 2024 रोजी ब्राइटकॉम ग्रुप प्रकरणात 25 पैकी 20 नोटीस प्राप्तकर्त्यांना निर्देश जारी करण्यात आले आहेत. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांच्यावर देखील सेबीने ब्राइटकॉम गृप कंपनीचे शेअर्स विकण्यावर बंदी घातली होती.

ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांनी घसरले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये सलग चौथ्या ट्रेडिंग सेशनमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. 2024 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत या कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांनी कमजोर झाले आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 36.82 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.27 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,438.54 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Share Price NSE Live 01 March 2024.

हॅशटॅग्स

Brightcom Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x