22 November 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Goldiam Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर 1012% परतावा देणारा शेअर तुफान तेजीत येणार, ऑर्डरबुक मजबूत झाली

Goldiam Share Price

Goldiam Share Price | गोल्डियम इंटरनॅशनल या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस नफा कमवू इच्छित असाल तर, तुम्ही गोल्डियम इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. या कंपनीला नुकताच 50 कोटी रुपये मूल्याची एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.85 टक्क्यांच्या घसरणीसह 183 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 216.55 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 120.05 रुपये होती. गोल्डियम इंटरनॅशनल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,960.76 रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी गोल्डियम इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 1.00 टक्के वाढीसह 186.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गोल्डियम इंटरनॅशनल कंपनीला प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या डायमंडने जडलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या उत्पादनासाठी 50 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्याची अंतिम मुदत 30 मे 2024 निश्चित करण्यात आली आहे. गोल्डियम इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी हिरे आणि दागिन्यांची निर्मिती आणि निर्यात करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी जे दागिने बनवते ते सर्व ज्वेलरी उत्पादने सोने, प्लॅटिनम, रंगीत दगड आणि कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांपासून बनलेले असतात.

गोल्डियम इंटरनॅशनल कंपनीने डिसेंबर तिमाहीत मजबूत कामगिरी केली आहे. तिमाही आधारावर गोल्डियम इंटरनॅशनल कंपनीने 51.88 टक्के वाढीसह 202 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर वार्षिक आधारावर कंपनीच्या महसूल संकलनात 13.48 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 32 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तिमाही आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 39.13 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तर वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात 10.34 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत गोल्डियम इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सची किंमत 515 टक्के वाढली आहे. तर मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1012 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Goldiam Share Price NSE Live 01 March 2024.

हॅशटॅग्स

Goldiam Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x