24 November 2024 1:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Tata Investment Share Price | टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन शेअर्समध्ये अफाट तेजी, स्टॉकमधील सुसाट तेजीचे कारण काय?

Tata Investment Share Price

Tata Investment Share Price | टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. आज शनिवार दिनांक 2 मार्च रोजी सेबीने शेअर बाजाराच्या विशेष सत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. ( टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनी अंश )

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 7635.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 10.25 टक्के वाढीसह 8,027.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी भारतात 3 सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याच्या प्रस्तावांला मंजुरी दिली होती. त्यापैकी 2 सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याची जबाबदारी टाटा ग्रुपची असेल. या सेमीकंडक्टर प्लांट्समध्ये 1.26 लाख कोटी रुपयेची गुंतवणूक केली जाणार आहे. या तिन्ही युनिटचे बांधकाम अवघ्या 100 दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. मागील 3 वर्षात टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 587 टक्के परतावा कमावून दिला आहे.

5 मार्च 2021 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 1110 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 1 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 7635.10 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 10 वर्षात टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1587 टक्के परतावा कमावून दिला आहे. 14 मार्च 2014 रोजी या कंपनीचे शेअर्स 452.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 7635.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील एका वर्षात टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 279 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2013.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या 6 महिन्यांत टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 211 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 2458.75 रुपयेवरून वाढून 7635.10 रुपये किमतीवर पोहचले होते. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 7635.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1735 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Investment Share Price NSE Live 02 March 2024.

हॅशटॅग्स

Tata Investment Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x