24 November 2024 3:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

IREDA Share Price | 3 महिन्यात 150% परतावा देणारा IREDA शेअर तुफान तेजीत, 1 दिवसात 7.76 टक्के वाढला

IREDA Share Price

IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )

आज शनिवारी विशेष सत्रात देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे. आज शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 7.76 टक्के वाढीसह 161.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

गेल्या एका महिन्यापासून आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. याकाळात कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांनी घसरले होते. मात्र मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 150 टक्के वाढली आहे. आयआरईडीए या कंपनीमध्ये भारत सरकारने 75 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. डिसेंबर 2023 मध्ये परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आयआरईडीए कंपनीचे 1.88 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी एका निवेदनात म्हंटले की, “आयआरईडीए कंपनी बी2सी विभागात रूफटॉप सोलर, पीएम-कुसुम, इलेक्ट्रिक आणि रिटेल प्रकल्प हाती घेण्यासाठी एक उपकंपनी स्थापन करण्याचा विचार करत आहे. आयआरईडीए कंपनी भारत सरकारच्या मान्यतेनंतर रिटेल सेक्टरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निश्चित एक उपकंपनी स्थापन करेल.

भारतातील नवीकरणीय ऊर्जेचे उद्दिष्ट प्राप्त करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल. भारतातील ऊर्जा क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासाठी आयआरईडीए कंपनी आपले सामर्थ्ये आणि संसाधने एकत्र करून, विविध प्रकल्पांना मजबूत आर्थिक सहाय्य प्रदान करणे, शाश्वतता आणि पर्यावरण जागरूकता वाढवणे यासाठी वचनबध्द आहे”.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 02 March 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x