24 November 2024 3:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Suzlon Share Price | 44 रुपयाचा सुझलॉन एनर्जी शेअर मंदीच्या गर्तेतून बाहेर येणार? गुंतवणुकदारांनी नेमकं काय करावं?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आज शनिवार दिनांक 2 मार्च रोजी सेबीने शेअर बाजाराच्या विशेष सत्राचे आयोजन केले आहे. मात्र सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

सुझलॉन एनर्जी कंपनीला नुकताच एक ऑर्डर मिळाली आहे. EDF रिन्युएबल कंपनीने सुझलॉन एनर्जी कंपनीला प्रत्येकी 3 मेगावॅट क्षमतेच्या 10 विंड टर्बाइन पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. आज शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.32 टक्के घसरणीसह 44.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गेल्या एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकमध्ये 3 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के परतावा कमावून दिला आहे.

अनेक म्युच्युअल फंडांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स विकून नफा वसुली केली आहे. सध्या म्युचुअल फंडानी सुझलॉन एनर्जी कंपनीचे 4.4 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मात्र परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. जून 2023 मध्ये परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे 7.79 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सप्टेंबर 2023 मध्ये त्यांच्या शेअरहोल्डींगचे प्रमाण 10.88 टक्केवर गेले होते. डिसेंबर 2023 मध्ये हे प्रमाण 17.83 टक्केवर आले आहे.

त्याच वेळी, DII म्हणजेच देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री केली आहे. जून 2023 मध्ये DII ने सुझलॉन एनर्जी कंपनीचे 5.93 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सप्टेंबर 2023 मध्ये त्यांचे भाग भांडवल 9.83 टक्केपर्यंत वाढले होते. मात्र डिसेंबर 2023 मध्ये DII ने नफा वसुली केल्यामुळे त्यांचे भाग भांडवल प्रमाण 6.16 टक्केवर आले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 02 March 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x